Pages Menu
TwitterRssFacebook
Categories Menu

Posted by in Books

इस्लाम आणि भारतीय विचारवंत

“अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे”

 इस्लाम आणि भारतीय विचारवंत

 

अल्लाह एक तुं           – संत तुकाराम महाराज

 अल्लाह एक तुं, नबी एक तुं ।

काटते सिर पावों हाते नही जीव डराये ।।2।।

 

अनुवाद – “अल्लाह तू एकच आहे. तुझा अंतिम पैगंबर सर्वांसाठी एकच आहे. अल्लाह तूच आमचा रक्षक आहेस. तुझे आणि तुझ्या पैगंबराचे नाम घेताना कोण्या दुष्टाने आमचे डोके, हात, पाय जरी कापले तरी तूच आमचा रक्षणकर्ता आहेस. म्हणून आमचा जीव मुळीच भिणार नाही.”

    (संदर्भ : गाथा वैद्यगोळी, अभंग क्र. 3,988)

अल्लाह करे सोहि होय    – संत तुकाराम महाराज

अल्लाह देवे अल्लाह दिलावे ।

अल्लाह दाता अल्लाह खिलावे ।

अल्लाह बिगर नही कोय। अल्लाह करे सोहि होय ।।

भावार्थ अल्लाह देणारा पालनकर्ता आहे. अल्लाहव्यतिरिक्त दुसरा कोणी ईश्वर नाही. अल्लाह करील तेच होईल.                                        (संदर्भ : सार्थ श्री तुकाराम गाथा, पृष्ठ क्र. 892)

 

अल्लाह तूं गनी             –संत नामदेव महाराज

मै अंधुलेकी टेक तेरा नामु खुंदकारा ।

मै गरीब मै मसकीन तेरा नामु हैं अधारा ।।

दरिआऊ तूं निहंद तूं बिसिआर तूं धनी।

देहि लेहि एक तूं दिगर को नही ।।

करीमा रहिमा अल्लाह तू गनी ।

हाजार हजूरी दरि पेसी तू मनी ।।

तूं दाना तूं बीना मै बिचारु किया करी।

नामेचे सुआमी बरवसंद तूं हरी ।।

         (संदर्भ : श्री नामदेव गाथा, अभंग क्र. 2263, पृष्ठ क्र. 848)

अल्लाह रखेगा वैसा ही रहना         – संत एकनाथ महाराज

अल्लाह रखेगा वैसा ही रहना ।

मौला रखेगा वैसी भी रहना ।।

कोई दिन राजा बडा अधिकारी ।

एक दिन होय कंगाल भिकारी ।। 

एका जनार्दनी करत करतारी । 

गाफल क्यो करता मगरुरी।।          

           (संदर्भ : संत एकनाथ, जीवन और काव्य, पृष्ठ क्र. 168)

 

तारणहार तो न्यारा है रे हाकिम वो रहमान   – संत बहिणाबाई

जैसा हि करना वैसाहि भरना संचित येहि प्रमाण ।

तारणहार तो न्यारा है रे हाकिम वो रहमान ।।3।।

दो दिनकी है दुनिया रे बाबा ।

नर तर येही सार । नई आवेगा दुजे बार । आपकु पछान । देख दाई मकान । पकड रहिमान । क्यो हुआ है हैरान ।

भावार्थ – हे जग तर क्षणभंगुर आहे. हेच माणसाच्या यशाचे सार आहे. तू या जगात पुन्हा येणार नाहीस. म्हणून स्वत:ला ओळख. मरणोत्तर जीवनाच्या निरंतर निवासस्थानाकडे लक्ष केंद्रित कर. यासाठी रहिमानशी नाते जोड. हैराण का होतोस?

            (संदर्भ : संत बहिणाबाइंर्ची गाथा, पृष्ठ क्र. 171 व 382)

 

विखुरला इस्लाम कराया शहाणा       – संत तुकडोजी महाराज

विखुरला इस्लाम कराया शहाणा ।

संघटीत केले त्याने स्वजना ।  त्या काळी ।।

लोक प्रतिमापूजक नसावे ।

त्यांनी एका ईश्वरासी प्रार्थावे ।।

        (संदर्भ : ग्रामगीता, अध्याय 27, ओवी नं. 90, पृष्ठ क्र. 294)

 

सर्वांचा निर्मिक आहे एक धनी  – .जोतीराव फुले

सर्वांचा निर्मिक आहे एक धनी ।। 

त्याचे भय मनी ।।  धरा सर्व।।

मानवांचे धर्म नसावे अनेक ।। 

निर्मिक तो एक ।।  जोती म्हणे ।।

                 (संदर्भ : महात्मा फुले समग्र वाङ्मय, पृ. क्र. 608)

 

 

आर्य दस्यु इस्लामने मुक्त केले       –महात्मा जोतीराव फुले

कोणी नाही श्रेष्ठ ।  कोणी नाही दास ।। 

जात प्रमादास । खोडी बुडी ।।

मोडीला अधर्म आणि मतभेद । 

सर्वांत अभेद । ठाम केला  ।।11।।

केल्या कमाईचा न धरी अभिलाष । 

खैरात दीनास । देई सर्व  ।।12।।

मानवी मनाचा घेई अंती ठाव । 

कल्याणाची हाव ।  पोटी माया  ।।13।।

मूर्तिपूजकांच्या बंडाशी मोडीले । 

ढोंगी वळविले ।  ईशाकडे   ।।14।।

आर्य दस्यु इस्लामाने मुक्त केले । 

ईशाकडे नेले ।  सर्व काळ   ।।22।।

आर्यधर्म – भंड इस्लामे फोडीले । 

ताटांत घेतले ।  भेद नाही   ।।23।।

मांगासह आर्या नेले मशीदीत । 

गणी बांधवात । आप्त सखे   ।।24।।

(संदर्भ : जवामर्द मुहम्मद, महात्मा फुले समग्र वाङ्मय, भाग 3 रा,पृष्ठ क्र. 572)

 

इस्लाम धर्मात मूर्तिपूजा कोणत्याही स्वरूपात पुढे आली नाही                 –साने गुरुजी

 

“जो परात्पर प्रभु स्वत:च्या सामर्थ्याने व प्रेमाने या विश्वाचे नियमन करतो त्या सत्य देवाची जाणीव अरबांना पूर्णपणे आली. मूर्तिपूजा कोणत्याही स्वरूपात पुढे आली नाही आणि जी अरबजात केवळ मूर्तिपूजक होती त्यांना संपूर्णपणे केवळ एक ईश्वराला भजणारे मुहम्मद (स.) यांनी केले. ही खरोखरच अद्भूत व अपूर्व अशी गोष्ट होती.”          

      (संदर्भ : इस्लामी संस्कृती, पृ. क्र. 142 ते 144)

 

जगात दीन (धर्म) एक आहे                  – विनोबा भावे

“कुरआनात आणखी एक गोष्ट मला सापडली ती म्हणजे जगात `दीन’ एक आहे. सत्याच्या मार्गाने चालणे हा `दीन’ म्हणजे धर्म आहे. पुढे सांगितले आहे की तुम्ही सर्व एकच `उम्मत’ एकच समाज आहात. चाली-रीतीमुळेच भेद पडले आहेत. त्याचे काही महत्त्व नाही. इस्लामचा प्रारंभी प्रचार त्यागामुळे, आत्मबळामुळे झाला. सुरुवातीच्या खलीफांच्या धर्मनिष्ठेमुळे इस्लामचा प्रचार झाला.

इस्लाम जेथे जेथे पोहोचला तेथे त्याने संदेश दिला-

  1. ईश्वर एक आहे.
  2. कोणताही मनुष्य कितीही मोठा असला तरी ईश्वराशी त्याची कदापि बरोबरी होऊ शकत नाही.
  3. आपल्या व्यवहारात कोणत्याही प्रकारचा भेदभाव नको.
  4. सर्वांचे नाते बरोबरीचे आहे.

इस्लामने जे म्हटले आहे ते मला फार महत्त्वाचे वाटते. त्याचे म्हणणे आहे की, पैगंबर मुहम्मद (स.) एक ईशदास आहेत, ईश्वर नव्हे. ईश्वर एक आहे, अद्वितीय आहे, त्याची बरोबरी कोणी मनुष्य करू शकत नाही. मुहम्मद (स.) त्याचा संदेश आणणारे पैगंबर तेवढे आहेत. इस्लाम सर्वांना समान मानतो. इस्लामने जातीभेदाविरूद्ध मोहीम सुरू करून एकाच ईश्वराच्या उपासनेवर जोर दिला. इस्लामची भारताला ही मोठी देणगीच आहे.”

                     (संदर्भ : सर्व धर्म प्रभुचे पाय – विनोबा भावे, पृष्ठ क्र. 16 ते 24)

 

जे चांगले असते तेच केवळ काळाच्या विनाशक शक्तीवर मात करते                            – स्वामी विवेकानंद

 

“तुम्ही म्हणाल की मुहम्मद (स.) यांच्या धर्मात चांगले ते काय असणार? पण लक्षात ठेवा, त्यांच्या धर्मात चांगले खचितच आहे. एरवी तो धर्म अजूनही टिकून कसा बरे असता? जे चांगले असते तेच केवळ काळाच्या विनाशक शक्तीवर मात करीत असते. इतर सर्वकाही काळाच्या भक्ष्यस्थानी पडले तरी ते मात्र टिकून राहत असते. जे काही चांगले असते ते सबळ व दृढ असते आणि म्हणूनच तेच टिकतही असते. इस्लाम धर्मात कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत. मुहम्मद (स.) समतेचे आचार्य होते, मानवजातीतील बंधुभावाचे प्रचारक होते. मुस्लिमांतील भातृभावाच्या अग्निमंत्राचे दीक्षागुरू होते. उच्च उदात्त तत्त्वज्ञान उराशी बाळगूनही आम्ही हिंदू लोक प्रत्यक्ष आचरणात, रोजच्या व्यवहारात किती दुबळे ठरतो हे खरोखरच लक्षात घेण्यासारखे आहे. परंतु अन्य धर्मियांच्या तुलनेने मुस्लिम याबाबतीत कितीतरी श्रेष्ठ ठरतात. जातीचा किंवा वर्णाचा विचार न करता, सर्वांप्रती समभाव बाळगणे हे मुस्लिमांचे उज्वल वैशिष्ट्य आहे.” 

         (संदर्भ : स्वामी विवेकानंद ग्रंथावली, भाग 4, पृष्ठ क्र. 160)

 

इस्लाममुळे सकल विश्वाला प्रकाश आणि शांती लाभली           – महात्मा गांधी

 

“त्या काळी जेव्हा पाश्चिमात्य विश्व अंधकारात बुडलेले होते, पूर्व क्षितिजावर एक तेजस्वी तारा चमकला ज्याद्वारे सकल विश्वाला प्रकाश आणि शांती लाभली. इस्लाम खोटा धर्म नव्हे. हिंदूंनीही याचा अशाच प्रकारे अभ्यास केला पाहिजे जसा मी केला आहे. मग तेही माझ्यासारखेच इस्लामशी प्रेमभाव बाळगतील. आता माझा पूर्वीपेक्षा जास्त प्रबळ विश्वास आहे की इस्लामच्या प्रसारामागे तलवारीची शक्ती नव्हती.”                         (संदर्भ : जगतमहर्षि, पृष्ठ क्र. 2)

 

भारतीय विचारसरणी जीवनशैलीत इस्लामचे खूप मोठे योगदान आहे.                         – साधू वासवानी

 

“अरबस्थानातील मुलींच्या हत्येच्या अमानुष पद्धतीला इस्लामने संपविले. इस्लामने पूर्ण दारूबंदीचा उपदेश दिला. इस्लामने श्रद्धा, सबुरी, सहिष्णुता, स्वार्थ-त्याग अशा श्रेष्ठ गुणांच्या संवर्धनावर जोर दिला. आशिया व यूरोप महाद्वीपांमध्ये इस्लामने शुद्ध, पवित्र, साधे व सरळ स्वभावाने वागण्याच्या पद्धतीचा प्रसार केला. इस्लामने `बिस्मिल्लाह हिर्रहमा निर्रहीम’ (अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे) चा उद्घोष दिला. करुणासागर ईश्वराचा संदेश लोकांमध्ये पसरविला. आफ्रिका, चीन, मध्य आशिया, यूरोप, इराण इ. देशांमध्ये सभ्यता व संस्कृतीची ज्योत प्रज्वलित करण्याचे काम इस्लामने केले. ज्या काळात यूरोप अज्ञानाच्या अंधकारात होता त्या वेळी स्पेनमधील मुस्लिम विद्वानांनी विज्ञान व साहित्याच्या मशालीला उंच केले. त्यांनी वैद्यक, प्राकृतिक, इतिहास, दर्शन व कलाच्या अध्ययनाचा प्रबंध केला. इस्लामी शासनकाळात कित्येक उद्योगांचा विकास झाला. सेविल, कोद्रोवा, बार्सिलोनोच्या मुस्लिम विश्वविद्यालयांमध्ये मुक्त, उदार भाववृत्तीचे विज्ञान व दर्शन शिक्षणाची सोय होती. मुक्तद्वार ग्रंथालये होती, त्यांनी आकाश निरीक्षण केंद्र बनविले. रासायनिक प्रयोगशाळा उघडल्या. इब्ने सीना या अरबी शास्त्रज्ञाने तर्कशास्त्र, मनोविज्ञान, भौतिकी, तत्त्वमीमांसा, नीतिशास्त्र, इ. विषयांवर संशोधनात्मक ग्रंथ लिहिले.

हे सांगण्यास काही संकोच वाटत नाही की भारतीय विचारसरणी व जीवनशैलीत इस्लामने खूप मोठे योगदान दिले आहे. भारताची कला, शिल्प, काव्य, दर्शन यांची समृद्धी वाढविण्यात इस्लामचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.”      

(संदर्भ : सतपुरुषों के साक्षी, पृष्ठ क्र. 66, सूफी संत, पृष्ठ क्र. 82)

भूतो भविष्यति असा इस्लामचा चमत्कार               – प्रबोधनकार ठाकरे

“अल्पावकाशात इस्लाम धर्मानुयायांची झालेली भरभराट इत्यादी गोष्टी इतक्या चमत्कारपूर्ण आहेत की मानवी अंत:करणाला आश्चर्याने थक्क करून सोडणारी यासारखी दुसरी हकीकत जगाच्या उपलब्ध इतिहासात मिळणे शक्य नाही. केवळ 23 वर्षांच्या अवधीत सिंधू नदीपासून पोर्तुगालपर्यंत आणि अरबी समुद्रापासून व्होल्गा नदीपर्यंत एका अरबी गरीब कुटुंबातील मनुष्याने आपल्या धर्ममताचा प्रसार एकजात करण्यास समर्थ व्हावे, हा न भूतो न भविष्यति असा चमत्कार कोणाच्या अंत:करणात कौतुकाच्या उर्मी उठविणार नाही?”            

                   (संदर्भ : हिंदू धर्माचे दिव्य, पृष्ठ क्र. 11 व 22)

इस्लाम आतंक नव्हे आदर्श

                      – स्वामी लक्ष्मीशंकराचार्य

 

`इस्लाम – आतंक नव्हे आदर्श’ या पुस्तकाच्या सुरूवातीलाच मी माझ्या पूर्वीच्या पुस्तकासंबंधी अर्थात `इस्लामी आतंकवाद का इतिहास’ (हिंदी) विषयी लिहिले आहे की वास्तविक इस्लाम जाणून घेतल्यावर मला माझ्या चुकीची जाणीव झाली. इस्लामविषयी मी जे काही पूर्वी लिहिले व बोललो ते सर्व अनुचित होते.                  

           (संदर्भ : इस्लाम – आतंक नव्हे आदर्श, पृष्ठ क्र. 80-83)

 

इस्लामी संस्कृतीचे आकलन केले पाहिजे

                          – डॉ. भालचंद्र नेमाडे

पैगंबर साहेबांच्या प्रबोधनाने अरबांतील त्या काळातील रानटी समाजामध्ये एक परिपूर्ण बदल घडवून आणला, अशा पद्धतीचं आकलन इस्लामी संस्कृतीचं केलं पाहिजे.

भारतात एका सहस्त्रकात भक्ती संप्रदायांनी ब्राट्ठाट्ठाणी धर्माविरूद्ध बंड उभारून इस्लाम धर्मातील समतेची आणि एक दयाळू ईश्वराची संकल्पना पुढे आणली व यामागे अनेक हिंदू संतांचे गुरू मुस्लिम सूफी संत होते.

कुरआनबाबत बोलायचे तर ते एक अप्रतिम वाङ्मय आहे. मुळात त्या अरबी भाषेतल्या कुरआनातली गेयता फारच क्वचित आढळेल अशी आहे. ऐकतांना `तृप्त व्हावं’ एवढं ते सुंदर वाङ्मय आहे. भाषांतरातला अर्थ आणि मूळ अरबी नादसौंदर्य जुळवलं तर फार आल्हाददायक वाटते. नुसतं ऐकावसच वाटतं.”

  (संदर्भ : सोळा भाषणे, पृष्ठ क्र. 60, 76 व निवडक मुलाखती, पृष्ठ क्र. 128)

 

तू आमुचा हवाला आम्ही तुझ्या हवाली  –सुरेश भट

 

तू आमचा सखा अन् तू एकटाच वाली। इय्याक नस्तईन ।।

तू आमचा निवारा । तू आमची खुशाली।इय्याक नस्तईन ।।

तू धीर। तूच दाता आम्ही तुझे सवाली।  इय्याक नस्तईन ।।

रस्ता खरा निघाला। आम्हा दिशा मिळाली। इय्याक नस्तईन।।

तू एकमेव आशा । तू न्याय तू निवाडा अन् तूच सर्वसाक्षी ।

तू आमचा हवाला । आम्ही तुझ्या हवाली। इय्याक नस्तईन्।।

         (संदर्भ : हम्द – सप्तरंग, पृष्ठ क्र. 39)

(`इय्याक नस्तईन’ या आयतचा (कुरआन-1:4) यमक रूपात उपयोग केला आहे. अर्थ होतो, “हे अल्लाह! आम्ही तुझीच मदत मागतो.”)

Post a Reply

Your email address will not be published.